Top News

कोरपन्याचा प्रतिक बनला नायब तहसीलदार #Korpana

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोरपना येथील प्रतिक गजाननराव बोरडे यांची नायब तहसीलदार पदी निवड झालेली आहे. गेल्या चार वर्षापासून त्याने जळगाव येथे अभ्यास करून व कोरोना काळात कोरपना येथील मिशन सेवाअभ्यासिकेत अभ्यास करत लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांना तो पुढे गेला आणि निकालात त्याने यश संपादन केले.
त्याने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळा कोरपना येथे व माध्यमिक शिक्षण वसंतराव नाईक विद्यालयात, उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे पुर्ण केले.
त्याचे वडील स्व. गजाननराव बोरडे हे वसंतराव नाईक विद्यालय कोरपना चे माजी मुख्याध्यापक तथा संस्थापक संचालक होते. तो माजी मुख्याध्यापक/प्राचार्य संजय ठावरी यांचा साळा असुन त्यांनी त्यास मोलाचे मार्गदर्शन केले. त्याने जिद्द, चिकाटी, नियमित अभ्यास करून यश संपादन केले. त्याने आपले यशाचे श्रेय आई श्रीमती कलावती, ताई सौ. माधुरी, नातलग व स्टुडंट्स फोरम ग्रुप चे सहकारी सदस्य तसेच निलेश मालेकर ( राज्य कर निरीक्षक ) व अनिल देरकर ( पोलीस उपनिरीक्षक ) व कोरपना नगरवासियाना दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने