Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

सिनेस्टाईलने एसडीओंनी पाठलाग करून रेतीचा टिप्पर पकडला #pombhurna

पोंभूर्णा:- उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी संजयकुमार डव्हळे हे आपल्या शासकीय वाहनतून रात्री एक वाजता कारवाई करिता निघाले असताना मध्येच मुल पोंभूर्ना रोडवर एक वाळूने भरलेला सुसाट वेगाने जाणारा टिप्पर दिसला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो थांबला नाही. उपविभागीय अधिकारी त्याचा पाठलाग करीत होते. दोन-तीन किलोमीटर पाठलाग केल्यानंतर ड्रायव्हरने टिप्पर रेती घाटाकडे वळवला.त्यानंतर टिप्पर चा वेग कमी झाल्यावर त्याला पकडण्यासाठी वाहन चालक उतरला,तोच टिप्पर पुन्हा निघून गेला.त्यानंतर उपविभागीय अधिकारी यानी स्वतः वाहन चालवत त्याचा पाठलाग केला आणि नदीच्या काठावर टिप्पर पकडण्यात यश मिळवले.
त्यानंतर टिप्पर ला ताब्यात घेतले.रेती वाहतुकीचा कोणताही परवाना ड्रायव्हर कडे नव्हता.पोलिसांना बोलावले. नंतर तो टिप्पर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. कारवाई झालेला टिप्पर एमएच -३४ बिजी -७१४६ हा प्राशिष संतोषवार पोंभुर्णा यांच्या मालकीचा आहे. तर वाहन चालक विकास पेंदोर वाहन चालवत होता. त्या टीप्परला पावणे तीन लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच चेक बल्लापूर घाटातून एक ट्रॅक्टर रात्री उशिरा तीन वाजता अवैध वाहतूक करित असताना जप्त केला. वाहन चालक पळून गेला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आला. ट्रॅक्टरला एक लाख १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत