बगड खिडकी परिसरातील मोठे नाले, लहान नाले, भूमिगत नाल्यांची सफाई करा #chandrapur

Bhairav Diwase

भाजयुमो महानगर जिल्हा सचिव प्रविण उरकुडे यांची निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:- बगड खिडकी परिसरात मोठे नाले, लहान नाले, भूमिगत नाली आहे. कित्तेक दिवसापासून या नाल्याचे सफाई झालेली नाही. त्या मुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. नाली सफाई करण्यात यावी यासाठी दि. 01 जुनला प्रविण उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली वार्डातील नागरिकांकडून महानगर पालिका अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना भाजयुमो महानगर जिल्हा सचिव प्रविण उरकुडे, भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के, अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष साजिद पठाण, अमन वाघ, भाग्यश्री पिंपळकर, मंगला ठाकरे, पूजा विक्रमवार, जय यादव, सोनू यादव यांची उपस्थिती होती.