नारंडा येथे १ कोटी निधीमधून साकारणार भव्य पशुवैद्यकीय रुग्णालय #chandrapur #Korpana

Bhairav Diwase

जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते भूमिपूजन

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक पाठपुराव्याला यश
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते संपन्न झाले.सदर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीकरीता १ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून याकरीता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक पाठपुरव्याला यश आले आहे.
नारंडा येथे श्रेणी-२चे पशुवैद्यकीय रुग्णालय असून सदर रुग्णालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली होती,त्यामुळे गावातील पशुपालकांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकला असता,तसेच रुग्णालयात काम करणारे डॉक्टर व इतर कर्मचारी यांना सुद्धा भीतीचे वातावरण होते,त्यामुळे सदर जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम आवश्यक होते सदर बाबीची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला, सदर मागणीची दखल घेत सुनील उरकुडे यांनी नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीकरिता १ कोटी रुपये निधी मंजूर केला.
यावेळी नारंडा येथे सदर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले,यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी कोंडलकर सर,माजी सरपंच वसंतराव ताजने, पोलीस पाटील नरेश परसुटकर,मुख्याध्यापक गुरूमुखी सर,माजी उपसरपंच अनिल शेंडे,ग्रामपंचायत सदस्य बापूराव सिडाम,अनिल मालेकर,नागोबा पाटील उरकुडे,मारोती शेंडे,भिकाजी घुगुल,सुभाष पाटील डवरे,विनोद तिखट उपस्थित होते.