जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बापरे...! स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडला "तो" भीषण अपघात #accident

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गवरील चुनाभट्टी वळण रस्त्यावर एका मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या (एमएच ०६ - एबी ७७९३) डाव्या बाजूचा टायर फुटल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले. वाहनाची रोड सायडिंगला जबर धडक बसली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. यात त्या चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. हा अपघात कारचे स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात पुढे आली आहे.
कार चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे जात होती. दरम्यान, अचानक कारचे स्टेअरिंग लाॅक झाले. यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकावर धडकल्याने कारचे डाव्या बाजूचे टायर फुटल्याने ही भीषण अपघात झाला. या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील दोन्हीं इसम गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी वाहन चालकांनी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलविले. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा केला. अपघातग्रस्त कार रस्त्यावर असल्याने वाहतुकीस अडचण जात होती. त्यामुळे दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून क्रेनच्या साहाय्याने कारला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
🌅
वाहन चालवताना प्रत्येक वाहन चालकाने वाहन सुरू करण्याच्या आधी स्टेअरिंगच्या लाॅककडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा, असे अपघात घडून येतात.
दिनकर पोले,
वाहतूक पोलीस, बल्लारपूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत