Top News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी नारी शक्तीचा जगाला परिचय करून दिला:- माजी आमदार अँड. संजय धोटे #jiwati


नंदप्पा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
जिवती:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नारीशक्तीचा जगाला परिचय करून दिला. समाजाचे हित साधण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले,अशा थोर स्त्री शक्तीला मी आदरांजली अर्पण करतो असे माजी आमदार अँड. संजय धोटे यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन जिवती तालुक्यातील नंदप्पा येथे करण्यात आले. तसेच ह.भ.प.कांचनताई शेळके यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले. याप्रसंगी माजी आमदार अँड.संजय धोटे बोलत होते कार्यक्रमा प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले.


यावेळी माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी कीर्तनकार ह.भ.प.कांचनताई शेळके यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला, तसेच आयोजकांकडून माजी.आमदार अँड.यांचा सुध्दा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमा प्रसंगी मंचावर उपस्थित ईतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले,यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या सह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपसभापती महेश देवकते प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, नगरउपाध्यक्ष डॉ.अंकुश गोतावळे,भाजपा विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश केंद्रे,भिमराव पवार,गावचे सरपंच गणेश कदम,येलके मामा,ज्ञानबा मामा,प्रेमदास राठोड,नामदेव सलगर,तुकाराम कुरगिल,कोरबन कुरगिल,माधव नेवळे संतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्तविक गोविंद गोरे यांनी तर संचालन सुनिल जाधव सर यांनी केले यावेळी गावातील तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने