जाहिरात... Advertisement... विज्ञापन

प्राचार्य पदी अशोक झाडे रूजू.

प्राचार्य पदी अशोक झाडे रूजू.


मूल:- नवभारत क. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पदाचा पदभार जेष्ठ अध्यापक अशोक झाडे यांनी शिक्षक, शिक्षकेत्तर कमंचारी यांचे उपस्थितीत स्विकारला. मावळते प्राचार्य श्री. डि. एम रडके यांनी आज श्री. झाडे यांना पदभार सोपविल्यानंतर नवभारत विदया. व क. विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे उपस्थितीत अशोक झाडे यांनी आज सकाळी प्राचार्य तथा मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला आहे.
याप्रसंगी प्रा. महेश पानसे, प्रा. किसन वासाडे, प्रभाकर धोटे, मावळते प्राचार्य श्री. रडके, श्री. गुंडोजवार, हेमंत सुपनेर, श्री. मुंडरे, सुनिल नागपूरे, अनिल कडस्कर व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे श्री. अशोक झाडे हे याच
क. महाविद्यालयाचे विदयार्थी असून त्यांचे निवडीबद्धल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत