Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर रायफलने झाडली गोळी; नंतर केली आत्महत्या #Gadchiroli

गडचिरोली:- माओवाद्यांशी दोन हात करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे.
जवानांवर गोळी झाडल्यानंतर या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्य राखीव दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यात बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला अशी मृत झालेल्या जवानांची नाव आहे.
पुण्याहून हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात झाले होते. रायफलमधून श्रीकांत बेरड याने बंडू नवतरला यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील कॅम्पचे जवान होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोन्ही जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेमुळे राज्य राखीव दलात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत