चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातील मादी बिबट वनविभागाच्या जाळ्यात #Chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- शहरालगत दुर्गापूर परिसरात हल्लेखोर मादी बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकली आहे. दुर्गापूर- ऊर्जानगर परिसरात सातत्याने वाघ-बिबट हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती. या भागात वनविभागाच्या वतीने अनेक ठिकाणी वन्यजीव कैद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेली तीन वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. यानंतर स्थानिक संतप्त जमावाने वनविभागाच्या 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्रभर कोंडले होते. या उद्रेकानंतर हल्लेखोर बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी झाले होते. यादरम्यान विविध पथकांद्वारे वाघ-बिबट्यचा शोध सुरू होता.
दुर्गापूर क्षेत्रातील वार्ड 1, 3 या परिसरात एका माती बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. तीन महिन्यांपासून धुमाकूळ मानवी जीवितास धोकादायक ठरले होते. या बिबट्यबाबत जनतेत प्रचंड आक्रोश होता. त्याला वरिष्ठांकडून गोळीबाराचे आदेश दिले होते. वनविभागाचे पथक गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्यच्या शोधात होते. 13 मे पहाटे बिबट अडकले. त्यामुळं त्याला जेरबंद करण्यात आले. अशी माहिती चंद्रपूर वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर यांनी दिली.