पडोली येथील आमरण उपोषणास शिवसेना महिला आघाडीचा पाठींबा #chandrapur

चंद्रपूर:- पडोली चौकात वाहतूक नियंत्रण सिग्नल लावण्यात यावे या मुख्य मागणीसाठी माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास चंद्रपूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पाठींबा दिला.
चंद्रपुरातील सर्वात जास्त व्यस्त असलेल्या पडोली चौकात वाहतूक नियंत्रण सिग्नल लावण्यात यावे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मार्केटला जाणाऱ्यांची जास्त रहदारी असल्यामुळे पार्किंग व नो पार्किंग चे बोर्ड लावण्यात यावे, कोसारा चौक ते पडोली चौक या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट परत सुरू करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी ३ मे पासून मनोज ठेंगणे आमरण उपोषणास बसले आहे.
या चौकात अनेक छोटे-मोठे अपघात नेहमी होत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पडोली चौकात सिग्नल लावणे आवश्यक आहे. यासह अन्य मागण्या रास्त असल्याने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा संघटक सौ उज्वला प्रमोद नलगे यांच्या नेतृत्वात आज ६ मे रोजी उपोषण मंडपास भेट देत उपोषणास जाहीर पाठींबा दिला.

यावेळी माजी जिल्हा संघटक कुसुम उदार, मूल तालुका संघटक रजनी झाडे, नागाळा (सि.) ग्रामपंचायत सरपंच रंजना कांबळे, नागाळा (सि.) सदस्य निर्मला कामडी, सद्दाम कनोजे, सुष्मित गौरकार, चेतन कामडी, निखील घाडगे, सुप्रित रासेकर, ज्ञानेश्वर लोनगाडगे, रोहन नलगे यांच्यासह महिला आघाडी, शिवसेना, युवासेना शिवसैनिकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत