पडोली चौकात त्वरीत ट्राफिक सिग्नल बसवा:- आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश #chandrapur

पडोली चौकाचे सौंदर्यीकरण करणार

माजी सैनिक श्री. मनोज ठेंगणे यांचे उपोषण मागे
चंद्रपूर:-‌पडोली चौकात वाहतुक नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नल बसवावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेले माजी सैनिक श्री. मनोज ठेंगणे यांचे उपोषण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सोडविले.
दि. ६ मे २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या सहकार्यांसह श्री. मनोज ठेंगणे यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. आपल्या मागणीची तीव्रता श्री. मनोज ठेंगणे यांनी आ. मुनगंटीवारांना सांगीतली आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत याबाबत सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभीयंता श्री.कुंभे यांना ट्राफिक सिग्नल बसविण्याचे निर्देश दिले.
येत्या काही दिवसात पडोली येथील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आ. सुधीर मुनगंटीवार हे वचनाला जागणारे नेते आहेत. दिलेली आश्वासने ते तात्काळ पूर्ण करतील याचा आपल्याला विश्वास असल्याचे माजी सैनिक मनोज ठेंगणे म्हणाले त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.
यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, नामदेव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्रि,‍ अनील डोंगरे प्रदेश सचिव युवा मोर्चा, हनुमान काकडे तालुका अध्यक्ष भाजपा,विजय आगडे,विनोद खडसे,‍ अनीता भोयर, कीरणताई बुटले, राजेश कुबेर, अजय चालेकर, मोनु ठाकुर, अंजु ठेंगणे, श्रीकांत देशमुख, रणजित डवरे, समीर लाथे, राजीव वाढई,विष्णू वरभे,सिकंदर यादव, दुर्गा बावणे, मोहम्मद अब्बास, राकेश बोरीकर हे ‍उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत