तिस वर्षापासून २४ तास वाहतयं बोरवेलचं पाणी #chandrapur

गावकरी आणि वन्यजीवांची तहान भागवतेयं बोअरवेल
चंद्रपूर:- बोअरावेलचं पाणी हवं तर हँन्डपंप मारावचं लागेल. हँन्डपंप न मारता बोअरवेल मधून सतत तिस वर्ष पाण्याचा प्रवाह सूरू आहे, असं कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. नव्यानं घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्यात अश्या दोन बोअरवेल आहेत की, ज्यातून चोविस तास पाण्याचा प्रवाह सुरू असतो. मागील तीस वर्षापासून ही बोअरवेल गावकरी, वनमजूर आणि वन्यजीवांची तहान भागवित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव. घनदाट जंगलानी वेढलेलं गाव. वन्यजीवांचा इथं मोठा आवास आहे. नुकतचं या वानक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. याच अभयारण्यात दोन बोअरवेल अश्या आहेत की ज्यातून चोविसतास पाण्याचा प्रवाह सूरू असतो. गावकरी, इथं येणाऱ्या वनमजूरांची तहान मागील तीस वर्षापासून ही बोअरवेल भागविते आहे.

सतत सूरू असलेल्या पाण्याचा प्रवाहाचा वापर आता वनविभागाने वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी केला आहे. वनतळ्यात या बोअरवेलचं पाणी सोडल्या जात आहे. अभयारण्यातील वाघ, तृष्णभक्षक प्राणी या पाण्यावर तृष्णा भागवितात. तसं कन्हारगाव हे खडकाळ जमिनीचा भुभाग. अश्या भागात पाण्याचे स्त्रोत्र फार कमी असतात. मात्र कन्हारगाव याला अपवाद ठरलं आहे. तीस वर्षापुर्वी ही बोअरवेल खोदल्या गेली. गावातील वृध्द सांगतात की, त्यावेळी या बोअरवेलचा पाण्याचे फवारे विस ते पंचवीस फुट वर जात असतं. आज बोअरवेलचा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. मात्र माणवासोबतच वन्यजीवांची तृष्णा ही बोअरवेल भागवित आहे. गावकरी याला निसर्गाचा चमत्कार म्हणतात.
ब्रिटिश शिकारी कन्हारगाव गाठायचे

अतिशय घनदाट अरण्य असलेलं कन्हारगाव वनक्षेत्र ब्रिटिश काळात शुटिंग ब्लाक म्हणून ओळखल्या जायचं. ब्रिटिश इथं शिकार करण्यासाठी यायचे. ब्रिटिशांनी इथं बांधलेलं गेस्ट हाऊस आजही सूस्थितीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत