राज्यात पाच महिलांसह ९ जणांचा बुडून मृत्यू #death

लातूर, अकोला, चंद्रपूरमधील घटना
तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये राज्यातील ९ जणांचा शनिवारी बुडून मृत्यू झाला. त्यात पाच महिलांचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे शनिवारी पाणी आणण्यासाठी तलावावर गेलेल्या मुलीचा तोल गेला आणि ती तलावात बुडू लागली. ते बघून आईनेही व पाठोपाठ लहान मुलीनेही उडी घेतली. नंतर सोबतच्या दोघींनी तलावात उड्या मारल्या. पाचही जणींना पोहता येत नव्हते. त्या पाचही जणींचा बुडून मृत्यू झाला. राधाबाई धोंडिबा आडे (४५), दीक्षा आडे (२१), काजल आडे (१९), सुषमा राठोड (२२), अरुणा राठोड (२६) अशी पाच जणींची नावे आहेत.
तर चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील माजरी येथील वर्धा नदीच्या पात्रात मासळी पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. अशोक रामपाल यादव (४२), रोहित राहुल मल्लय (८) अशी मृतकांची नावे आहेत. तिसऱ्या घटनेत अकाेल्यातील दाेन युवकांचा तेलंगणातील नदीत बुडून मृत्यू झाला. प्रतीक गावंडे (२२) व किरण लटकुटे (२२) हे गाेदावरी नदीत बुडाले.

1 टिप्पणी: