तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यात ठार #death #Tiger #tigerattack

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील सिताराम पेठ येथील ताडोबा बफर झोन क्षेत्रात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली 65 वर्षीय वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना पहाटेच्यादरम्यान घडली.
जाईबाई जेंगठे (वय 65, राहणार मोहूर्ली) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ती पहाटे सहाच्या दरम्यान ताडोबा बफर झोन क्षेत्रात तेंदूपत्ता संकलनासाठी गेली होती. तेंदूपाने तोडताना झुडपात दबा धरून बससलेल्या वाघाने हल्ला करून वृद्ध महिलेला ठार केले.
या घटनेची माहिती वनविभागाला कळताच मोहूर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाले.