ब्रम्हपुरी शहरातल्या एटीएमला मोठी आग #fire

Bhairav Diwase

बँक ऑफ बडोदा एटीएमची हानी
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
ब्रम्हपुरी शहरातल्या एटीएमला मोठी आग लागली. देलनवाडी परिसरातील बँक ऑफ बडोदा एटीएमची हानी झाली. सकाळच्या सुमारास एटीएममधून धूर निघत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली.
समोरच्या पेट्रोल पंपावरील नागरिकांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच ब्रम्हपुरी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोवर प्रचंड आगीमुळे मोठं नुकसान झालं होतं. बँक ऑफ बडोदाच्या शाखेला लागूनच हे एटीएम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर तापमानाच्या बाबतीत राज्य व देशात अग्रेसर आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.