प्रेमाच्या चंदेरी दुनियात
स्वप्न आपण रंगवू...
सांग प्रिये मजला
तुझ्या साठी कुठले गीत गाऊ... !! १ !!
अलगद प्रीतीचे भाव लिहले
प्रेमाचा पानावरी...
भेटण्यास मी तुजला बोलाविले
वैनगंगेच्या नदी किनारी... !! २ !!
तुझ्या घरी यायचो
नोट्स करून बहाणा...
खुन्नस पणे पाही
तुझा भाऊ शहाणा.... !! ३ !!
एकमेकांच्या श्वासात
प्रेमाचे झरे वाहू लागले...
पण तुझ्या खडूस बापामुळे
राहिले ते स्वप्न अधुरे अपुले... !! ४ !!
आयुष्याच्या या वळणावर
वचन दिले मी तुला रे...
घरच्यांच्या नकारामुळे आपले
राहिले ते स्वप्न अधुरे रे ..... !! ५ !!
उज्वल विजय त्रिनगरीवार
गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर