घराला लागलेल्या आगीत विवाहितेचा होरपळून मृत्यू #fire #firenews

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
एटापल्ली:- शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याने विवाहितेचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रात्री एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलिस ठाण्यांतर्गत दिंडवी येथे घडली. पौर्णिमा उत्तम बल (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे.
सायंकाळी वादळ आल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे इन्वर्टरवर घरातील वीज पुरवठा सुरू होता. काही वेळानंतर अचानक इन्वर्टर शार्ट सर्किट होऊन आग लागली. घरात पेट्रोल, साड्या व इतर साहित्य असल्याने पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यात पौर्णिमाचा होरपळून मृत्यू झाला. नंतर गावकऱ्यांनी आग विझवली. पौर्णिमाच्या पश्चात पती आणि एक मुलगा आहे. जारावंडी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.