चंद्रपूर:- विदर्भ फुटसाल फेडरेशन अंतर्गत विदर्भातील ८ स्पर्धकांची भोपाल येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. चौदावी ज्युनिअर नॅशनल फुटसाल स्पर्धा २०२२ भोपाल येथे दि. २२ मे ला पार पडणार आहे.
या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील आदर्श साईनाथ मास्टे ( सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर) यांची निवड झाली. निवडीबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यापूर्वी आदर्शने हिमालय पर्वत रांगामधील ४२२० मीटर उंच असणाऱ्या पातालशु पर्वत यशस्वीरीत्या सर केले होते. सोबतच जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धेत यश मिळवले होते. आदर्शने आपल्या निवडीचे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक सागर भुरे यांना दिले.