💻

💻

महाकाली कॉलरी व रय्यतवारी कॉलरी येथे पसरलेला कचरा व कचऱ्यामुळे तुडुंब भरलेले नाली साफ करून रोड चे नुतनीकरण करा व बंद असलेले स्ट्रीट लाईट त्वरीत सुरु करा #chandrapur

मनसे चे नेते किशोर मडगुलवार, वाणीताई सदालावार यांचा डब्लु सी एल प्रशासनाला आंदोलणाचा इशारा
चंद्रपूर:- महाकॉली कॉलरी व रय्यतवारी कॉलरी चंद्रपुर येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असुन याकळे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे देशात मान.पंतप्रधाण महोदय स्वच्छ भारत अभियान राबविन्यासाठी सर्वोपरी प्रयत्नशील आहेत पंरतु स्थानिक शासकिय कर्मचारी मात्र या स्वच्छता मिशनला कुठे तरी गालबोट लावल्याचे दिसुन येत आहे आपल्या दुर्लक्ष पणामूळे परीसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आरोग्य धोक्यात आहे तसेच मागील कित्येक दिवसापासून परीसरातील स्ट्रीट लाईट बंद असून येथील नागरीकांना अंधारात वास्तव्य करावा लागत आहे तेव्हा आपण जातीने लक्ष देऊन परीसरातील कचर्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी महाकाली कॉलरी कॅर्न्टींग चाैक कपिल चौक ते बायपास रोडचे नुतनीकरण करावे महाकाली कॉलरी येथील क्वाटॅर्स ए टाईप बि टाईप समोरील रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागन्याचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप रामीडवार यांच्या प्रमुख मार्गदर्शणात मनसे जिल्हासचिव श्री.किशोर मडगुलवार तथा मनसेच्या महिलासेना शहर उपाध्यक्षा सौ.वाणी ताई सदालावार यांनी महाप्रबंधक साहेब यांना दिले असुन सदर समष्येचे निराकारण सात दिवसाचे आत झाले नाहि तर मनसेकडून परीसरातील नागरीकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करन्यात येईल आणि या जबाबदार संबधीत प्रशासन असेल निवेदन देनार्या शिष्टमंडळात पदाधिकारी शोभाताई वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष महीला सेना,क्रिष्णा गुप्ता,प्रविन शेवते,महेश गडपल्लीवार,शैलेश सदालावार उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत