राजुरा येथील विद्यार्थीनी कु. रिया लेखराजानी हिने पुणे विद्यापिठातून पटकावीले साहा सुवर्ण पदक #Rajura

Bhairav Diwase
माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- राजुरा येथील व्यापारी,राहुल ट्रेडर्सचे संचालक सुनिल लेखराजानी यांची कन्या कु.रिया हिने एम.बी.ए.(फायनान्स) या विषयात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून साहा(०६) सुवर्णपदक पटकविल्या बद्दल पुणे येथे राज्याचे उच्च व तन्त्र शिक्षण मंत्री उदय सामंत,राष्ट्रीय मुल्यांकन आणी मान्यता परिषदेचे अध्यक्ष डॉ.भुषण पटवर्धन,पुणे विधापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते साहा सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी सहकाऱ्यांसह घरी जाऊन कु.रिया यांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला,तसेच पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,माजी नगरसेवक राजेंद्र डोहे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजपचे नेते गणेश रेकलवार,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,भाजयुमो नेते रत्नाकर पायपरे,सुनिल लेखराजानी पराग दातारकर,सौ वर्षा लेखराजनी,कमल लेखराजनी उपस्थीत होते.