Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

अभाविपचा गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! #Gadchiroli #chandrapur


अभाविप ने दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापीठाने लवकरात लवकर घेतली नाही तर अभाविप द्वारे विद्यापीठाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा दिला
गडचिरोली:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली द्वारे गोंडवाना विद्यापीठावर विद्यार्थ्यांनचा विविध समस्यांना घेऊन दि 21 मे ला निदर्शने झालीत यामधे नागपूर विद्यापीठाने परीक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा नागपूर विद्यापीठाची ऑफलाईन MCQ पॅटर्न परीक्षा गोंडवाना विद्यापीठात सुद्धा राबवावी यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. तसेच परीक्षेचा प्रश्नसंच विद्यापीठाच्या संकेत स्थळावर अजून सुध्दा आली नाही त्यामुळे ती लवकरात लवकर संकेत स्थळावर टाकावी.
विद्यापीठातील विद्यार्थी अजून सुद्धा प्रयोगशाळेपासून वंचित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर विद्यापीठाची स्वतंत्र प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी
तसेच आचार्य पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोर्सवर पूर्ण होऊन जवळजवळ सहा महिने पूर्ण झाले तरीसुद्धा कोर्स नंतरचे अजूनही परीक्षा आपल्या विद्यापीठाने घेतली नाहीत. आचार्य पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रिसर्च सेंटर ची फी ही यावर्षी विद्यापीठाने अवाढव्य वाढवली आहे त्याचा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसला आहे त्यामुळे ही फीे कमीत कमी करण्यात यावी.
जिमखाना, अभियांत्रिकीची परीक्षा पुढे ढकलावी यासारख्या अन्य विषयावर सुद्धा अभाविप ने निवेदनात मागणी केली दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापीठाने लवकरात लवकर नाही घेतली तर अभाविप द्वारे विद्यापीठाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा अभाविप नगरमंत्री जयेश ठाकरे , जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर ,चेतन कोलते,अमन नवघडे , श्रुती काणेकर ,सागर हाजरा , तुषार तांबेकर , चिराग कोटगले ,प्रवीण चलाख,संदेश उरकुडे,अर्पित नंदेश्वर,सोनल राखडे,संकेत सोनुले,हर्षद कायाकर ,खिलेश फरदिया ,आकाश मेश्राम प्रांत सहमंत्री अभिषेक देवर , ब्रह्मपुरी जिल्हा संघटन मंत्री प्रवीण पात्रिकर ,गडचिरोली विभाग संघटन मंत्री शक्ती केराम आदींनी इशारा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत