माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी डोंगळहळदी तुकुम येथील वाऱ्याने उडालेल्या आरोची केली पाहणी pombhurna


विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आरोची दुरुस्ती करण्याची केली मागणी
पोंभुर्णा:- माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी गट ग्रामपंचायत चेक हत्तीबोडी मध्ये येत असलेल्या डोंगरहळदी तुकुम येथे भेट दिले. मागील दिवसांत वादळ वाऱ्याने झालेल्या तेथील आरोच्या नुकसानीची पाहणी केली.

आरो छपर उडाले असल्याने त्याची पाहणी करून गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गावातील नागरिकासोबत चर्चा केली.सध्या परिस्थितीत आरो बंद असल्याने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
दरवर्षी मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना अशातच पोंभुरणा तालुक्यात वादळी वाऱ्याने पाऊस आलेले असल्याने आरोचे छत चे नुकसान झालेले आहे.तरी त्या छप्पर ची लवकरात लवकर दुरुस्ती करून नागरिकांना पिण्याकरिता पाणी मिळावे याकरिता राहुलभाऊ संतोषवार यांनी विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली मागणी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत