💻

💻

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध नागरिकाचा मृत्यू #Tiger #tigerattackचंद्रपूर:- शहराजवळ सिन्हाळा येथील वृद्ध ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दशरथ पेंदोर (65) असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या ग्रामस्थाचं नाव आहे. पेंदोर हे बकऱ्या चारण्यासाठी गावतलावाशेजारी गेला होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह या ताडोबातील प्रसिद्ध वाघाचा वावर आहे. मात्र वाघावर नजर ठेवूनही अखेर ग्रामस्थाचा जीव गेला आहे.
बकऱ्या चारण्यासाठी गावतलावाशेजारी गेलेले दशरथ हे शुक्रवारी संध्याकाळी परत न आल्याने गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी शोधाशोध केली. शनिवारी सकाळी याच परिसरात दशरथ यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह या ताडोबातील प्रसिद्ध वाघाचा वावर आहे.
अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला 'वाघडोह' माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो. ही शक्यता लक्षात घेता वनविभाग त्यावर नजर ठेवून होता. मात्र वाघावर नजर ठेवूनही अखेर ग्रामस्थाचा जीव गेला. यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागाबद्दल तीव्र नाराजी दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत