Top News

राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांच्या ड्रीम प्रोजेक्ट दिव्यांग समृद्धी उद्योगाच्या मार्केटिंग टीम कामासाठी सज्ज #amrawati



प्रत्येक तालुक्यातून दिव्यांग महीलांना मीळणार रोजगाराची संधी
अमरावती:- राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या दिव्यांग समृद्धी उपक्रम च्या मार्केटिंग टीमसोबत आज दी. २१ ला चर्चा झाली . यात जवळपास प्रत्येक तालुक्यातून एक दिव्यांग महिला मार्केटिंग करण्याकरिता उत्सुक व तयार असून त्यांना विविध लघु उद्योगाच्या मार्केटिंगची माहिती त्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री मयूर ठाकरे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आली.
या मार्केटिंग साठी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे,अमरावती, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, तिवसा, दर्यापूर, चिखळदरा, धारणी, बडनेरा आदी तालुक्यांतून दिव्यांग महिला पुरुष उपस्थित हाेते. दिव्यांग समृद्धी उपक्रम याची सुरवात बेलोरा या गावांमधून झालेली असून येथील दिव्यांग बांधव भगिनी बऱ्याच प्रमाणात साहित्य चे उत्पादन करतात. त्यामुळे गावात अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. मात्र इतर तालुका तील दिव्यांग बांधव भगिनींना रोजगार मिळावा यासाठी आज मार्केटिंगकरिता चौदा तालुक्यातून महिला पुरूषांना बोलावण्यात आले होते.
याचबरोबर या मार्केटिंगसाठी आलेल्या महिलांना मुंबई येथून आलेल्या अपर्णा सुकळकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विशेष कार्य अधीकारी श्री मयूर ठाकरे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रहार अमरावती जिल्हा दिव्यांग संधटनेचे राजेश कडू यांनीही उपस्थितांना मार्केटिंगविषयी मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने