Top News

लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 100 टक्के, तर कला शाखेचा 97 टक्के निकाल #bhadrawati


उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या तसेच आपल्या शिस्त प्रियतेची ख्याती असलेल्या लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचा बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 96. 63 टक्के इतका लागला आहे.दरवर्षीप्रमाणे आपल्या उत्कृष्ट निकालाचे सातत्य याहीवर्षी या महाविद्यालयाने राखले आहे.
विज्ञान शाखेचा विद्यासागर नितीन दादीलवार हा विद्यार्थी 88 टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आला. श्रद्धा धनंजय गुंडावार 83. 33 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकावर आली. तर साहिल शामराव दुरूटकर 80 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झाला. कला शाखेतून रमेश संजय काकडे हा 72. 66 गुण घेऊन प्रथम, प्रतिक्षा बालाजी नन्नावरे 72 टक्के गुण घेऊन द्वितीय, तर प्रणय योगेश ढोके 66. 16 टक्के गुण घेऊन तृतीय आला.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे संचालन करणा-या लोकसेवा मंडळ भद्रावती तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, मंडळाचे सदस्य तथा माजी प्राचार्य गोपाल ठेंगणे, माजी प्राचार्य अविनाश पामपट्टीवर, सदस्य उमाकांत गुंडावार, संजय पारधे, प्राचार्या आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रूपचंद धारणे. प्रा. नितीन लांजेवार, प्रा. गौरकर, प्रा. हुमणे, प्रा .स्वाती गुंडावार,
प्रा. शेंडे, प्रा. रोडे, प्रा. मुंजे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने