Top News

नारीशक्ती महिला प्रभागसंघ वार्षिक अधिवेशन सोहळा संपन्न* *गुंजेवाही-लोणवाही प्रभाग #sindevahi

उमेद-MSRLM अभियानाचे शाश्वत विकासाकडे वाटचाल

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नारीशक्ती महिला प्रभागसंघ प्रभाग गुंजेवाही-लोनवाही *प्रभागसंघ वार्षिक अधिवेशन सोहळा* किन्ही येथे पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा. सौ. सिमाताई गणवीर, संघर्ष प्रभागसंघ अध्यक्ष नवरगाव-पळसगाव, उदघाटक - मा.श्री. भारत गेडाम सरपंच ग्रा. प.किन्ही.
विशेष अतिथी - मा.सौ. शालिनी गुरनुले सरपंच ग्रा. पं. गुंजेवाही, मा.सौ. मोसमी आत्राम सरपंच ग्रा. पं. नवेगाव लोन, मा. सौ. सरिता नागदेवते सरपंच ग्रा. पं. लोनखैरी, मा.सौ. कोमल गुरनुले उपसरपंच ग्रा. पं. किन्ही, मा.सौ.शीतल मारबते ग्रा. पं. सदस्य किन्ही, मा.सौ.लता भेंडाळे ग्रा. पं. सदस्य किन्ही, मा.सौ. रागिणी भेंडाळे ग्रा. पं. सदस्य किन्ही, मा.श्री. वामन पेंदाम ग्रा. पं. सदस्य किन्ही, मा.श्री. विवेक नागरे सर ता.अ. व्यवस्थापक, मा. श्री. उद्धव मडावी सर ता.व्यवस्थापक, मा.श्री. संदीप उईके प्रभाग समन्वयक, मा.श्री. ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समन्वयक, मा.कु.सविता उईके प्रभाग समन्वयक, मा.श्री. आशिष दरडे प्रभाग समन्वयक, मा.सौ.कुंदाताई अलोने अध्यक्ष झेप प्रभागसंघ रत्नापुर-शिवणी, मा.सौ.निलिमाताई कोवले अध्यक्ष भरारी प्रभागसंघ,मा.सौ.कविता ताई अगडे सचिव संघर्ष प्रभागसंघ,
कार्यक्रमाचे प्रस्ताविक - मा.सौ.रेणुका ताई भेंडाळे अध्यक्ष नारीशक्ती प्रभागसंघ, यांनी केले.
कार्यक्रम स्थळी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, गीतगायन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विजेत्यांचा सत्कार व पुरस्कार देण्यात आले.
सत्कार सोहळ्यात उत्कृष्ट ग्रामसंघ प्रथम पुरस्कार स्वामिनी महिला ग्रामसंघ गुंजेवाही, तर उत्कृष्ट समूह पुरस्कार भाग्यश्री स्वयं सहायता समूह किन्ही यांना शिल्ड व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन - सौ. मीनाक्षीताई गायकवाड आणि सौ. भारतीताई वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. रत्नमाला ताई वाघमारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. प्रभाकर मानकर (CFM), श्री. मयूर खोब्रागडे (CLM), सौ.अर्चना ताई शेंडे (CTC) व समूह संसाधन व्यक्ती, कृषी सखी,पशु सखी,बँकसखी, सर्व ग्रामसंघातील पदाधिकारी व समूहातील महिला यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने