सागरा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व* *अध्यक्षपदी युवराज निबुध्दे, उपाध्यक्ष सुभाष चौधरी #bhadrawati

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील सागरा सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून संस्थेच्या अध्यक्षपदी युवराज नथ्थुजी निबुध्दे, तर उपाध्यक्ष म्हणून सुभाष श्रावण चौधरी यांची अविरोध निवड करण्यात आली.
१३ सदस्य संख्या असलेल्या सागरा संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे १३ पैकी १३ ही सदस्य निवडून आले. विजयी उमेदवारांमध्ये युवराज नथ्थुजी निबुध्दे, सुभाष श्रावण चौधरी, प्रफुल्ल पांडुरंग खामणकर, कमल गोवर्धन वैद्य, लोडबा वासुदेव भोयर, गुणवंत नानाजी धांडे, गोदाबाई गुलाब बांदुरकर, अमोल वारलु निव, संदीप बापुराव मारेकर, शांताबाई लटारी रासेकर, चंपत यादव सरोदे, अरुण संबा टोगें, दयाकर भाऊराव काकडे यांचा समावेश आहे. तर नुकत्याच झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी युवराज नथ्थुजी निबुध्दे तर उपाध्यक्ष म्हणून सुभाष श्रावण चौधरी यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. बोधे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून त्या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.