उभ्या बोलेरोला महिंद्रा एक्सयुव्हीची धडक #Accident

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्र एक्सयुव्ही गाडीने भरधाव वेगात मागून धडक दिली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत देवलगाव जवळ रविवारी (दि.१२) पहाटे ५.३० वाजता दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये १ जण जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३३-टी २६३६ चा चालक फिर्यादी विलास अर्जुन चौधरी (४५,रा. गांगलवाडी, चंद्रपूर) हे ताब्यातील बेलोरोमध्ये कोंबड्या घेऊन राजनांदगाव येथून वडसाकडे जात असताना त्यांनी देवलगाव येथील आश्रमशाळेजवळ वाहन थांबवून शौचाला गेले होते. या दरम्यान महिंद्र एक्सयुव्ही वाहन क्रमांक जीजे ०५-जेएम ७८६७ चा चालक कनसू छेदीलाल निषाद (२५, रा.लखमापूर, चंद्रपूर) याने ताब्यातील वाहनाने बोलेरोला मागून भरधाव वेगात धडक दिली. यामध्ये महिंद्रा एक्सयुव्हीमधील चालक कनसू निषाद, छेदीलाल निषाद, सोनू सुरजदिन निषाद, हंसराज छेदीलाल निषाद, रूक्कीनीबाई नयन निषाद, सुमता सोनू निषाद, गजुलिया निषाद, नयन सुरजदिन निषाद, पुनादेवी निषाद, सुनील निषाद व पुनम निषाद (रा. लखमापूर, चंद्रपूर) हे जखमी झाले. तर बेलोरोमध्ये झोपलेला क्लीनर विवेक सुरेश हुड (२६,रा.आरमोरी, गडचिरोली) याला मार लागला नाही.
हा अपघात एवढा जबर होता की फिर्यादी विलास चौधरी यांचे बोलेरो वाहन रस्त्याच्याकडेला शेतात शिरले व त्यातील कोंबड्यांचे कंटेनर तुटून पडले. तर महिंद्रा एक्सयुव्ही सुद्धा समोरून चकनाचूर झाली. आवाज येताच फिर्यादी विलास चौधरी धावून आले व त्यांनी क्लीनर सोबत जखमींना वाहनातून बाहेर काढले. तसेच गावकरीही मदतीला आले त्यांनी रूग्णवाहिका बोलावून जखमींना नवेगावबांधच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविले. याप्रकरणात पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटारवाहन कायदा १९८८ कलम १८४, ६६, १९२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)