हजरत मोहम्मद पैगंबर यांचा अपमान सहन करणार नाही. #korpana

Bhairav Diwase



कोरपना:- मुस्लिम समाज बांधवांचे प्रेरणास्थान, धर्मगुरू प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अभद्र व आक्षेपार्ह्य विधान करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या निष्कासित प्रवक्त्या नुपूर शर्मा तसेच नवीन जिंदाल आणि नरसींमानंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी अशी मागणी गडचांदूर येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे. यासंदर्भात ठाणेदार सत्यजित आमले यांंच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. निवेदन देण्यात आले. रजा मस्जिद चे हाफिज मौलाना हसनैन रजा यांनी प्रभारी पी. एस.आय. शिंदे याना निवेदन देण्यात आले. नूपुर शर्मा व नवीन जिंदल, नरसिमानंद यांचे वर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी हाजी शब्बीर ढाकवाला, अक्सा मस्जिद चे हाफिज हसनैन गफ्फार शेख, मौजन, पत्रकार ममताजअली, रफिक निजामी, कुतूबुद्दिन मोजन, मुणाफ कुरेशी, अनिस कुरैशी, मुनाफ कुरैशी, सय्यद साहेब अली, पाशा शेख, सिराज, जिलानी, मदिना मजीद चे हाफिज, समेत शेकडो नागरिकांनी उपस्थित होते.