जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अनियंत्रित कारची झाडाला धडक, दोघांचा मृत्यू तीन जण जखमी #injury

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी शहराजवळच्या विद्या निकेतन कॉन्व्हेंट मार्गावर होंडा सिटी अनियंत्रित कारची झाडाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 युवक गंभीर जखमी झाले आहेत. सनी वाधवानी (24) आणि शुभम कापगते (28) अशी दोघा मृत तरुणांची नावे आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मृतक व जखमी सर्व वडसा येथील रहिवासी आहेत. तीनही जखमी युवकांवर ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या अपघाताची नोंद ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कार अनियंत्रित झाल्याने अपघात

मयत आणि जखमी सर्व युवक होंडा सिटी कारने ब्रम्हपुरीकडे चालले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरालगत वडसा मार्गावर असलेल्या विद्या निकेतन कॉन्व्हेंट येथे वेगवान कारने झाडाला धडक दिली. गाडीचा वेग जास्त असल्याने कार अनियंत्रित झाली आणि झाडावर आदळली. या अपघातात वडसा येथील 2 युवक जागीच ठार झाले तर 3 युवक गंभीर जखमी झाले आहेत.
 मयत सनी वाधवानी आणि शुभम कापगते दोघेही वडसा येथील रहिवासी आहेत. तर सुमित मोटवानी (27) व इतर दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत