राजुरा ते शेडवाही बस चालू करा:- सुदाम राठोड #Jivati

चंद्रपूर:- जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी जनतेची समस्या पाहून राजुरा येथील आगार प्रमुख यांना निवेदन देऊन राजुरा ते गडचांदूर नगराळा जिवती मार्गे शेडवाही बस चालू करा अशी मागणी केली कारण शेडवाही मार्गावरील जनतेला जिवती किंवा गडचांदूर येथे ये-जा करण्यासाठी नाहक त्रास होतो आहे.
आता काही दिवसातच शाळा सुरू होणार विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास मोठा त्रास होईल या समस्येचा हल म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड व सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड आणि जय विदर्भ पार्टी जिवती तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी आगार प्रमुख राजुरा यांना निवेदन देऊन सात दिवसाच्या आत बस सुरू करा अशी मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदाम राठोड यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत