भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आवाहन
कोरपना:- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका च्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, प्रमुख पाहुणे संजय धोटे माजी आमदार राजुरा, खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर, सुदर्शन निमकर माजी आमदार राजूरा, विवेक बोढे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, नामदेव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, राजू घरोटे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, नुतनकुमार जिरवणे, किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख, पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, सौ. विजयालक्ष्मी डोहे महिला जिल्हा महामंत्री, सौ इंदिराताई कोल्हे जिल्हा सचिव व इतर मान्यवर उपस्थित होत.
देवराव भोंगळे जिल्हा अध्यक्ष यांनी कोरपना तालुक्यातील बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती विविध विषयाची माहिती घेतली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व पुढील 18 जून पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावे असे आवाहन केले. तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
देवराव भाऊ भोंगळे व इतर मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक, विविध सोसायट्या, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या पूर्ण सदस्यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शक्ती केंद्र प्रमुखांना नेम प्लेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य अरुण मडावी, शशिकांत अडकिने, विजय रणदिवे, अमोल आसेकर, प्रमोद कोडापे, जयाताई धारणकर, दिनेश सुर, संजय चौधरी, नारायण कोल्हे, निखिल भोंगळे, उरकुडे, अनिल चांदेकर यांनी केले. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नारायण हिवरकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले.