भरधाव येणाऱ्या दुचाकीची सायकलस्वाराला धडक #accident

Bhairav Diwase
एकाचा जागीच मृत्यु तर दुसरा जखमी
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी-आरमोरी मुख्य महामार्गावर प्रभुकृपा राईस मिल उदापूर जवळ भरधाव येणाऱ्या दुचाकीची सायकलस्वाराला जोरदार धडक बसल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला तर सायकलस्वार जखमी झाला.
नितीन राजेंद्र नाकतोडे वय २५ असे अपघातात मृत्यु झालेल्या दुचाकी चालकाचे नाव असून राह. निलज ता. ब्रम्हपुरी येथील रहिवाशी आहे. तर अपघातात नकटु राऊत वय ६० राह पारडगाव हे जखमी दुचाकीस्वाराचे नावं आहे.
सविस्तर वृत्त असे की, मृतक दुचाकी चालक नितीन हा ब्रम्हपुरी ला ४:०० ते ५:०० वाजताच्या सुमारास स्वगाव नीलज येथून ब्रम्हपुरीला काहीं महत्वाच्या कामानिमित्त गेला. काम आटपून गावाकडे निघाला असता दुचाकी वरून नियंत्रण सुटल्याने ब्रम्हपुरी ला जात असलेल्या सायकलस्वार नकटु राऊत यांना जब्बर धडक दिली त्यामुळे सायकलस्वार नकटु राऊत हे जखमी झाले.माञ दुचाकी ही भरधाव असल्याने दुचाकी खुप दुर सरपटत गेल्याने दुचाकीचालक नितीनच्या डोक्याला जब्बर मार लागला त्यामुळे नितीन चा जागीच मृत्यु झाला. जखमी सायकलस्वाराला ब्रम्हपुरी येथील रुग्णालय येथे नेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नितीन च्या जाण्याने नाकतोडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीनच्या जाण्याने नाकतोडे कुटुंब व गावापरिसर शोकसागरात बुडालेला आहे. घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभाग करीत आहे.