सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करा:- माजी आमदार अँड संजय धोटे #gondpipari #chandrapur


आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात भाजपकडून पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल

गोंडपिपरी:- आज दिनांक १३ जुन २०२२ ला अंदाजे दुपारी १२ ते २.०० ते ३.५० च्या दरम्यान खेमदेव किसनराव गरपल्लीवार रा. गोंडपिपरी यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते आ. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांचे एका पोस्ट वर आक्षेपार्ह महिलांना अपमाणित करणारी पोस्ट सोशल मिडीया गोंडपिपरी लाईव्ह, गोडपिपरी व धाबा ब्रेकिंग न्युज या सोशल मिडीया ग्रुपवर प्रकाशित केली.


सोशल मीडिया च्या माध्यमातून खेमदेव गरपल्लीवार यांनी गोडपिपरी तालुक्यातील सोशल मीडिया वाटस्पअप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह भाष्य करित अश्लील टिप्पणी केलेली आहे. खेमदेव गरपल्लीवार  गोडपिपरी येथील काँग्रेस समर्थक नगर सेविका सौ. शारदा गरपल्लीवार याचे पती असून यांनी गोडपिपरी शहरातील विविध ग्रुपवर आक्षेपार्ह टिप्पणी करित विशिष्ट समाजावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सदर पोस्ट मुळे कोणत्याही स्त्रीला अपमानित वाटेल तसेच सामाजिक शांतता भंग होईल व समाजात तेढ निर्माण केलेली पोस्ट प्रकाशित केलेली आहे. खेमदेव यांनी ब्राम्हण समाजातील स्त्रीवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून अपमाणित केलेले आहे. व इतर महिलांना सुध्दा अपमान वाटेल अशी कृती केलेली आहे. ही पोस्ट महिलेला अपमाणित करण्याचे उध्येशाने ही टिप्पनी केली असल्याने तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
या आक्षेपार्ह पोष्ट विरोधात राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक जिवन राजगुरू पोलीस स्टेशन गोडपिपरी याना तक्रार दिली. सदर तक्रारी संदर्भात त्वरित दखल घेऊन त्याचे विरोधात कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक गोंडपिपरी यांनी माजी आमदार संजय धोटे व भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी व भाजपा पदाधिकारी यांना दिले.
यावेळी पोलीस स्टेशनला माजी आमदार अँड संजय धोटे व भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे तसेच महिला अध्यक्षा सौ. अरूणा जाभुळकर यांनी आपल्या सहिनिशी तक्रार दाखल केली आहे. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सुहास माडुरवार, तालुका महमंत्री रवि पावडे, भाजपा शहर अध्यक्ष चेतनसिंग गौर, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, पंचायत समिती माजी उपसभापती मनिष वासमावार, तालुका कार्याध्यक्ष साईनाथ मास्टे, भाजयुमो अध्यक्ष प्रशांत येल्लेवार, गणेश डाहाळे, मनोज वनकर, नगरसेविका मनिषाताई दु्यौधन, नगरसेविका कुमारी मनिषाताई मडावी, नगरसेविका सौ. अश्विनी तोडासे, सौ. कोमल ताई फरकडे, सौ. रेणुका ताई येल्लेवार तसेच भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गोंडपिपरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत