रानडुकराच्या शिकार प्रकरणी दहा अटकेत #pombhurna #arrested

Bhairav Diwase
0
देवाडा बुद्रुक शेत शिवारातील घटना

भुजला नवेगाव वन नियत क्षेत्रात आधीही झाली होती शिकार

डॉग स्काॅटला केले होते पाचारण
पोंभूर्णा :- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणार्‍या भुजला नवेगाव वन नियत क्षेत्रातील देवाडा बुद्रुक शेतशिवारात कुत्र्याच्या सहाय्याने रानडुक्कराची शिकार केल्या प्रकरणी वनविभागाने दहा जणांना अटक केली आहे.
घोसरी वनक्षेत्रातील भुजला नवेगाव वन नियत क्षेत्रातील देवाडा बुद्रुक शेत शिवारातील शेतात काही लोकांनी कुत्र्याच्या सहाय्याने रानडुकराची शिकार केली असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.माहितीच्या आधारे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मोठ्या शिताफीने दहा आरोपींना ताब्यात घेतले. या शिकार प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे काय याचाही तपास वनविभागाने सुरू केला आहे. सदर आरोपींना पोंभूर्णा वनकोठडीत ठेवण्यात आले असून १४ जून ला सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदर कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार , क्षेत्र सहाय्यक अजय बोधे, वनरक्षक विनायक कस्तुरे व चमूने केली असून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आरोपींना पकडण्यासाठी वनविभागाच्या डॉग स्काॅटला पाचारण करण्यात आले होते.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक श्वेता बोडडु , सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
कार्यवाही करतांना पोंभूर्णा क्षेत्र सहाय्यक आनंदराव कोसरे, वनरक्षक दुषांत रामटेके,वनरक्षक प्रशांत शेंडे, वनरक्षक राजेंद्र मेश्राम, वनरक्षक ममता राजगडे, वनरक्षक मिनाक्षी मेश्राम व आदी वन अधिकारी व कर्मचारी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)