खंडणी वसूली प्रकरणात २ राजकिय पुढाकाऱ्यांना अटक
#पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात ट्रक्टर विक्रीचे पेसै काढून देण्यासाठी खंडणी वसूली प्रकरणात दि. १० जुन ला राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांवर पोंभुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विधवा महिलेकडून खंडणी वसूली प्रकरणात ऑल इंडिया पँथर सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांच्यावर कलम 384, 385, 506 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसाचा पिसिआर देण्यात आला.
हि कारवाई पोंभुर्णा पोलिस स्टेशन ठाणेदार धर्मेंद्र जोशी, अविनाश झाडे, बादल जाधव, हवालदार वासुदेव आत्राम, राजकुमार चौकशी, श्रीकांत कलपल्लीवार यांनी केली. पुढील तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहेत.