Top News

ऑल इंडिया पँथर सेना सिंदेवाही अंतर्गत आंदोलन यशस्वी #chandrapur #sindewahi


आरोग्य विभाग लवकरच रिक्त पदे भरणार.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे लेखी आश्वासन

सिंदेवाही:- मागील अनेक वर्षापासून दुरावस्थेत असलेल्या वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या दूर करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने 10 जून पासून बेमुदत डरकाळी आंदोलन सुरू करून विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर धरणे आंदोलन करण्यात आल्याने अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गहलोत यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सर्व समस्याचे लगेच निराकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट होणार असून ऑल इंडिया पँथर सेनेच्या आंदोलनाला यश आले आहे.

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील एकूण २२गावे जोडली असून ६ उपकेद्रामधून या गावांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मागील अनेक वर्षापासून या आरोग्य केंद्रात अनेक रिक्त पदे असून औषधी पुरवठा, विविध आजारांचे तपासणी व उपकरणे, अशा अनेक समस्या या आरोग्य केंद्रात निर्माण झाल्या असल्याने या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा ढेपाळली होती. मागील सहा महिन्यापूर्वी ग्राम प्रशासनाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निवेदन देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. व आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा दिला होता. परंतु त्यानंतरही कोणत्याही पदाची भरती न केल्याने पुन्हा आरोग्यसेवा कोलमडली.
येथील आरोग्य अधिकारी हे स्वतः मनोरुग्ण असल्याने रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेना तालुका सिंदेवाही यांचे वतीने शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बेमुदत डरकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्वरित दखल घेऊन आंदोलनास्थळी पोहचले. आणि आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारून सर्व मागण्यांची त्वरित पूर्तता करण्याची लेखी आश्वासन दिले. त्यामुळे वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा खालावलेला दर्जा सुधारून या आरोग्य केंद्राचा कायापालट होईल असा आशावाद श्री.महेश बोरकर सरपंच, मंदा मुनघाटे उपसरपंच यांनी व्यक्त केला.
सकाळी दहा वाजता पासून सुरू झालेल्या या आंदोलनात ऑल इंडिया पँथर सेना तालुकाध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, उपाध्यक्ष महेंद्र कोवले, तालुका सचिव सुनील गेडाम, युवाध्यक्ष तथागत कोवले, विरेन्द्र मेश्राम प्रसिद्धी प्रमुख, डॉ. रेवानंद बांबोळे, तेजेंद्र नागदेवते, सुभाष रामटेके, उपकार खोब्रागडे, प्रजय कोवले, विल्सन कोवले, प्रणय कोवले, ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर, उपसरपंच मंदा मुनघाटे, सदस्य महेंद्र सूर्यवंशी, नागेश बंडीवार, अस्मिता रामटेके, प्रीती करमेंगे, गीता मेश्राम, सुरेखा चीमल्लवार, पाणलोट समिती अध्यक्ष राजू नंदनवार, सुनील घाटे पत्रकार,व इतर नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने