वरोरा:- शेतात काम करीत असताना वादळी वाऱ्यासह वीज पडून एका 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. तर 5 मजूर गंभीर जखमी आहेत.
वरोरा तालुक्यातील दिंदोडा शेत शिवारातील घटना, सोहम हरिदास काळे (20) असे मृताचे नाव आहे. शनिवारी दुपारच्या दरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व मजूरांनी शेतात असलेल्या एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याच दरम्यान वीज पडली. जखमींना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत