Top News

ग्रामपंचायतच्या चुकीच्या धोरणामुळे कवठाळा ते इरई रस्त्याची दुरावस्था #korpana



गावातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- तालुक्यातील कवठाळा ते इरई हा रस्ता अतिशय खराब होता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये सदर रस्त्याचे बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले.इरई हे गाव भारोसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असून भारोसा ग्रामपंचायतने वर्धा नदी घाटावरील रेतीकरिता नाहरकत प्रमाणपत्र दिले.त्यामुळे येथील रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूक सुरू होऊन रस्ता अतिशय खराब झाला.त्यामुळे गावातील नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करतना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.इरई ग्रामवासीयांसाठी गावाच्या बाहेर निघासाठी हा एकमेव मार्ग आहे, ग्रामपंचायतच्या चुकीच्या धोरणामुळे सदर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

यावर्षी सुद्धा रेतीकरिता भारोसा ग्रामपंचायततर्फे ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरु असून यामध्ये इरई ग्रामवासीयांचा प्रचंड विरोध आहे.तरीसुद्धा ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी खुप आटापिटा करत आहे, त्यासाठी ग्रामपंचायततर्फे ग्रामसभेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.परंतु कोरम अभावी सदर ग्रामसभा  रद्द करण्यात आली,परंतु सदर रेतिघाटाकरिता ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये अशी इरई येथील नागरिकांची भावना आहे,जेणेकरून आणखी रस्ता खराब होणार नाही.परंतु ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेते यावर गावातील नागरिकांचे लक्ष आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने