Top News

भाजयुमो व विशाल निंबाळकर मित्र परिवार तर्फे विविध लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
चंद्रपूर:- येथील भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपुर तर्फे सोमवार 20 जूनला भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन महानगरात करण्यात आले आहे.


प्रारंभी,जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नास्ता व चहा वाटप कार्यक्रम,लालपेठ कॉलरी शिव मंदिर येथे रुद्राभिषेक व वृक्षारोपन,
तुकूम मित्र परिवार तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,महाकाली मंदिरात मिठाई वाटप,
गंजवार्ड मित्र परिवार तर्फे सरकारी दवाखान्यात फळ वाटप, बंगाली कॅम्प मंडळ तर्फे वृक्षारोपण,इंदिरानगर मित्र परिवार तर्फे गरजुंना धान्य किट पाटप,हनुमान मंदिर चौक येथे हायमास्ट लाईट चे उद्घाटन,बालकेंद्र मित्र परिवार तर्फे विठ्ठल मंदिर प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,टागोर क्रिडा मंडळ, विठ्ठल मंदिर वार्ड तर्फे - भव्य आरोग्य शिवीर,युवा हनुमान भजन मंडळ तर्फे आरोग्य कार्ड नोंदणी व कार्ड वितरण,साईबाबा क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळ तर्फे वृक्षारोपण, श्री. नागरीक वित मंदिर वार्ड, यांचे घराजवळील सिमेंट कॉक्रिट रोड चे उद्घाटन, हनुमान मंदिर बाबुपेठ तर्फे वृक्षारोपण व प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, श्री. दुलार विठ्ठल मंदिर वार्ड, यांचे घराजवळील सिमेंट कॉफिट नाली व त्यावरील स्टॅप वे उद्घाटन या कार्यक्रमांचा यात समावेश आहे.या सर्व कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांची उपस्थिती राहणार असून नगर सिव्हील लाईन मंडळ मित्र परिवार तर्फ नवजात शिशुंना मच्छरदानी वाटप व हनुमान मंदिर बापूजी नगर तर्फे आरोग्य कार्ड नोंदणी व कार्ड वितरण केले जाणार आहे.या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक  भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर महानगर व विशाल निंबाळकर मित्र परिवारने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने