Top News

अंगावर विज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

पोंभूर्णा:- तालुक्यात आज सकाळ पासूनच पावसाने मेघ गर्जनेसह जोरदार हजेरी लावली पावसाच्या सरिने शेतकरी राजाही सुखावला मात्र याच मेघ गर्जनेने विज कोसळून एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला पोंभूर्णा तालुक्यातील सातारा तुकुम येथील शेतकरी मधुकर देवाजी परचाके वय 48 वर्ष हे शेतीच्या कामाकरीता सकाळी आपल्या शेतात गेले मात्र मेघ गरजने सह जोरदार पाऊस सुरू झाल्याने ते घराकडे निघाले मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते वाटेतच त्यांच्या अंगावर विज कोसळली आणि मधुकर परचाके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूच्या बातमी गावात पसरताच गावात शोककळा पसरली घरचा करता माणूसच असा अचानक निघून गेल्याने परचाके कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर पसरले.
घटनेची माहिती मिळताच उमरी पोलिस घटनास्थळावर पोहचले असून घटनेचा तपास सुरू आहे मृतक मधुकर परचाके यांच्या मागे पत्नी मुले असा मोठा परिवार आहे. सदर घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने परचाके कुटुंबीयांना सहाय्य करावे अशी मागणी गाववाशियांकडून होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने