वर्धा नदी घाटावर पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू # bhadrawati

Bhairav Diwase


भद्रावती,दि.१८(तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील पिपरी (दे.) येथे वर्धा नदीच्या घाटावर अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या इसमाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
दिलीप मारोती रणदिवे (५०) असे मृतक इसमाचे नाव असून तो येथील चंडिका वार्डातील डोलारा तलाव वस्तीत राहात होता. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुन मर्ग दाखल केला.
चंद्रपूर येथील रेस्क्यू पथकाने मृतदेह बाहेर काढला.पोलीस काँ.मनोहर नांदे व पोलीस शिपाई बेझलवार यांनी पंचनामा केला. त्यांना पिपरीच्या पोलीस पाटील सुनिता ठोंबरे यांनी सहकार्य केले.
बोटचालक अशोक गारगेलवार,दिलीप चव्हाण, अतुल चहारे,उमेश बनकर, मंगेश मते, वामन नक्षीणे,सुजीत मोगरे, गीरीश मरापे,अजीत बाटे यांचा रेस्क्यू टीममध्ये सहभाग होता.