ग्रामपंचायत सातरी येथे जिल्हानिधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन #chandrapur #rajura

Bhairav Diwase

माजी जि. प. सभापती सुनिल उरकुडे यांनी मंजूर करून दिला सातरी गावात रस्ता मजबुती करिता 5 लाखांचा निधी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- जि. प. चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती यांनी तालुक्यात विविध गावात विविध विकास कामांकरिता विकासनिधी खेचून आणला त्यातच सातरी गावात सुद्धा अनेक काम मंजुर करवून घेतले त्यातले 5 लाखांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज दिनांक 18 जून रोजी गावातील समस्त पदाधिकारी व ग्रामस्थांच्या साक्षीने पार पडले.

तेव्हा उर्वरित मंजूर विकासकामांची पण लवकरात लवकर पूर्तता होईल तालुक्यात कुठल्याही गावाला मूलभूत विकासापासून वंचित राहू देणार नाही त्यासाठीच जनता आमच्यावर विश्वास ठेवून मतरूपी आशीर्वाद देत असतात असे प्रतिपादन सभापती सुनिल उरकुडे यांनी त्याप्रसंगी केले नंतर उपस्थित ग्रामस्थांच्या समस्येवर चर्चा करून काही समस्यांचे निवारण करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर प्रसंगी सातरी येथील सरपंच पद्माताई वाघमारे, उपसरपंच भाऊराव बोबडे, ग्रामसेवक पारखी मॅडम, प्रकाश बोढे, निशांत मून, वर्षाताई सातपुते, प्रांजु ताई हेपट, बबीताताई टेकाम, आदी ग्रा प सदस्य पो पा विजय पारशीवे, तं मु अ अशोक चकोर,माजी सरपंच मंगेश मोरे,शंकर धुर्वे,मारोती कार्लेकर,अरुण कार्लेकर, बादल वाघमारे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वांनी सभापती सुनिल उरकुडे यांचे आभार मानले आणि असेच सहकार्य गावाच्या पाठीशी असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.