Click Here...👇👇👇

माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मृतकांच्या कुटुंबाना आर्थिक मदत #pombhurna

Bhairav Diwase
दि. (१९ जुन) रविवारला सातारा तूकुम येथे मधुकर परचाके या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला होता
पोंभुर्णा:-: माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून आलेली 10 हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, माजी उपसभापती सौ. ज्योती बुरांडे यांनी सातारा तुकुम येथे मृतकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली.
दि.(१९) रविवारी ला सातारा तुकुम येथे सकाळी मधुकर परचाके शेतामधून घरी येत असतानाच पांदण रस्त्यांवर अंगावर वीज पडून या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने यातून कसे सावरायचे या विवंचनेत कुटुंबावर मोठे संकट असतांनाच माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कुटुंबाना आर्थिक मदत पाठविली होती.
उपस्थितांनी शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल असे कुटुंबातील व्यक्तींना शाश्वत केले. शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील मृत व्यक्तीच्या मागे पत्नी, व तीन मुली आहेत. यावेळी उपस्थित प्रविण चिचघरे, माजी सरपंच, बूथ प्रमुख खुशाल सीडाम, शक्तिकेंद्रप्रमुख जनार्धन लेनगुरे, भाजपचे राजू ठाकरे यावेळी उपस्थित होते.