फडणवीसांची रणनीती यशस्वी; पाचही उमेदवार विजयी #Mumbai

Bhairav Diwase
मुंबई:- दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा (Cong) एक उमेदवार विजयी झाले आहेत.
पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसचे भाई जगताप हे देखील विजयी झाले आहेत.