कपाशीची झाडे जाळताना आग लागून शेतकऱ्याचा मृत्यू #death

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- शेतात वखरणी उरकल्यावर वाळलेली कपाशीची झाडे जाळताना आग लागून शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील नांदगाव (पोडे) येथे आज दुपारच्या सुमारास घडली. सूधाकर पोडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील शेतकरी सुधाकर उद्धव पोडे (५५) यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. सध्या मान्सूनपूर्व शेतीची मशागत करण्याची लगबग सूरू आहे. आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास शेतात मशागत करण्यासाठी सुधाकर आणि त्यांच्या पत्नी शेतात गेले. सूधाकर पोडे यांनी शेतात नांगरणी केली. नांगरणीत गोळा झालेल्या कपाशीचे पुंजने ते जाळत होते. काठीने पुंजने जाळत असताना हवेच्या झोक्याने आगीचा लोळ त्याच्या अंगावर आला. यात डोक्यापासून कंबरे पर्यंत सूधाकर पोडे भाजले गेले. यात त्यांचा शेतातच दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.