Top News

विकास कनिष्ठ महाविद्यालय विहीरगांव येथील बारावीचा 96.26 टक्के लागला निकाल #results

योगेश भोयर महाविद्यालयातून प्रथम
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2022 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून ला लागला असून सावली तालुक्यातील विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगांव येथील बारावीच्या निकालामध्ये नेत्रदीप यश मिळाले आहे.
शाळेचा निकाल 96.23 टक्के लागला असून त्यामध्ये 107 विध्यार्थ्यां पैकी 103 विध्यार्थी चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. त्यामध्ये योगेश भोयर 85.50% (600 पैकी 513) गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला तसेच कु. रागिणी सहारे 80.50% (600 पैकी 483) गुण मिळवून दुसरा क्रमांक, साजन खोब्रागडे 77.50% (600 पैकी 465) गुण क्रमांक तिसरा, वैभव गायकवाड 77.17 (600 पैकी 463) गुण क्रमांक चौथा, कु. स्नेहा वाकडे 74.50 (600 पैकी 447) गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाबाबत लोकसेवा मंडळ विहीरगांव तसेच विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.हुलके सर,पर्यवेक्षिका कु.गराटे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व बारावी मधील उत्तीर्ण विध्यार्थी यांचे पालक वर्गाकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने