Top News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान व जोगापूर-राजुरा वन पर्यटन सफारी संपन्न.

वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे बर्ड फिडर देऊन नेफडो तर्फे स्वागत.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा:- मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय राजुरा (प्रादेशिक ) तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्‍था राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्य स्वच्छता अभियान व जोगापूर -राजुरा वन पर्यटन सफारी संपन्न झाला.

यावेळी राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, नेफडोचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर, प्रकाश मत्ते, संतोष संघमवार, आदीसह वनविभाग व नेफडो चे पदाधिकारी, कर्मचारी मोठयासंख्येने उपस्थित होते.


यावेळी जोगापूर -राजुरा वन पर्यटनात स्वच्छता अभियान व जोगापूर वनपर्यटन सफारी करण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांना बर्ड फिडर देऊन नेफडो तर्फे स्वागत करण्यात आले.
🆗 विविध वृक्षाची माहीती, वनपर्यटन स्थळाविषयी माहिती देण्यात आली. यावेळी विजय जांभुळकर, मनोज कोल्हापुरे, सारीपुत्र जांभुळकर, अविनाश दोरखंडे, राधा दोरखंडे, मनोज तेलीवार, ऍड. मेघा धोटे, राधा विरमलवार, स्वतंत्रकुमार शुक्ला, उमेश लढी, विना देशकर, अंजली गुंडावार, सचिन मोरे, जयश्री धोटे -मोरे, बबलू चव्हाण, उज्वला जयपूरकर, रवी बुटले, संगीता दुपारे, अश्लेषा चिडे, विलास कुंदोजवार, मिलिंद देवगडे, सुनील रामटेके, संजय दुधे, सुभाष पिंपळकर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने