Top News

नवभारत कनिष्ट विज्ञान महा. निकाल 98.97 टक्के.

नवभारत कनिष्ट विज्ञान महा. निकाल 98.97 टक्के.


मूल:- नुकत्याच जाहीर झालेल्या एच. एस. सी. बोर्डाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यात तालुक्यातील
नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून 98.97 टक्के निकाल देत या कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाने 291 विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरीता अग्रेषित केले आहे.
     या कनिष्ट विज्ञान महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील 294 विद्यार्थ्यांनी एच. एस. सी. बोर्डाची परिक्षा दिली होती. यातील 291 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर व्यावसाय शिक्षण विभागातून 31 विद्यार्थांनी यश संपादन केले आहे.
       सर्व यशस्वी विद्यार्थांचे
प्राचार्य अशोक झाडें, प्रा. महेश पानसे, प्रा. किसान वासाडे, प्रा. सुनिल कामडी, प्रा. प्रभाकर धोटे, प्रा. काटकर प्रा. पुस्तोडे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने