Top News

जनसंवाद विभागाच्या विद्यार्थांची आकाशवाणी केंद्रास भेट... विद्यार्थांनी जाणून घेतले कामकाज #Chandrapurचंद्रपूर दि.८ जून - येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे विद्यार्थांनी नुकतीच चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज नेमके कसे चालते हे जाणून घेतले.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे उद्दिष्ट असलेले आकाशवाणी...
मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध झाले असले तरी आकाशवाणी मात्र श्रोत्यांच्या मनात आपली जागा कायम राखून आहे. सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांच्या पुढाकारात अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जनसंवाद विभागाचे एम. ए. (मास कम्युनिकेशन) च्या अंतिम सत्राच्या विद्यार्थांनी चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट दिली.
यावेळी जनसंवाद विभागप्रमुख डॉ. पंकज मोहरीर हे प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर आकाशवाणी केंद्राचे सहायक निदेशक (अभियांत्रिकी)दिलीप मस्के यांच्यासह सहायक वरिष्ठ अभियंता आतिक शेख, अभियांत्रिकी सहाय्यक चंदू मत्ते यांनी केंद्राचे प्रसारण कसे होते हे तंत्रज्ञान विद्यार्थांना समजून सांगितले. विद्यार्थांनी आकाशवाणी कार्यक्रमाचे लेखन ,नभोवाणी चर्चा, वृतांत याविषयीचीही माहिती प्रसारण अधिकारी उमेश दुपारे यांच्याकडून जाणून घेतली.
 यावेळी ग्रंथपाल माहिती सहायक विलास चारथळ यांनीही मार्गदर्शन केले. या दौऱ्यासाठी जनसंवाद विभागाचे प्रा. संजय रामगीरवार , प्रा.ए.डी. खोब्रागडे यांचेही योगदान मिळाले.यावेळी जनसंवाद विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने